शुक्रवार 03 - 09 - 2010, 4:19 am

    नोकरीकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांना तसेच नोकरी देणा-या उद्योजकांना खालील विनामुल्य व पारदर्शक सेवा रोजगार व स्वयंरोजगार यंत्रणेमार्फत दिल्या जातात. :-

  1. नोकरीकरिता नांव नोंदणी
  2. नांव नोंदणी केलेल्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, अनुभव व वैयक्तिक सर्व माहिती विचारात घेऊन त्यास योग्य शासकीय / खाजगी नोकरी मिळण्याकरिता सहाय्य.
  3. नांव नोंदणी केलेल्या उमेदवारांस प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा ग त्याच्या कौशल्यात वाढ व्हावी याकरिता त्यास खाजगी तसेच निमशासकीय आस्थापनेत विद्यावेतनासह सहा महिन्याकरिता काम करण्याची संधी.
  4. नांव नोंदणी केलेल्या उमेदवारांना जास्तीत जास्त नोकरीच्या संधी प्राप्त होण्याकरिता यंत्रणेतील अधिकारी यांचा कार्यक्षेत्रातील उद्योजकांना संपर्क व त्यांची नोंदणी तसेच तत्पर व पारदर्शक सेवा उपलब्ध होण्याच्यादृष्टीने पाठपुरावा.

 

उद्योजकांना तात्काळ व योग्य उमेदवार मिळण्याकरिता प्रत्यक्ष कार्यालयात Spot Recruitment  ची सुविधा.

  1. आदिवासी उमेदवारांना शासकीय नोकरीकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी मार्गदर्शन व प्रशिक्षणाची मोफत सुविधा तसेच रू. १,०००/- प्रति महिना विद्यावेतन.
  2. स्वयंरोजगारास इच्छुक असलेल्या उमेदवारांना स्वयंरोजगाराच्या विविध योजना, नवनवीन व्यवसायाच्या संधी व प्रशिक्षण कार्यक्रम, सेवा सोसायटी स्थापनेकरीता माहिती व मार्गदर्शन.
  3. नांव नोंदणी केलेल्या उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगार, शैक्षणिक क्षेत्रात तसेच स्पर्धा परिक्षेव्दारे करियर घडविणयाकरीता माहिती व मार्गदर्शन त्याचप्रमाणे अद्यावत लायब्ररी सुविधा.

 

वरील सर्व कामांव्यतिरिक्त नोकरी व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना विभागाच्या http://ese.mah.nic.in या वेबसाईटव्दारे नांव नोंदणी, नोकरीविषयक जाहिराती पहाणे, स्पर्धा परिक्षा माहिती व प्रशिक्षण संस्थांविषयक माहिती, स्वयंरोजगाराकरिता अर्थ सहाय्याच्या विविध योजना, व्यवसाय शोध व प्रकल्प अहवाल इत्यादी महत्त्वाची व उपयुक्त माहिती देण्यात आलेली आहे.

सेवायोजन संघटनेमार्फत बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगार विषयक माहिती व मार्गदर्शन करून त्यांना स्वयंरोजगार करण्याकरिता प्रवृत्त करणे इत्यादी कार्ये या संघटनेकडे सुपुर्द करून महाराष्ट शासनाने या संघटनेचे १ मे, १९९८ पासून रोजगार व स्वयंरोजगार असे नामकरण केले आहे.  असे नामकरण करणारे महाराष्ट्र हे भारत देशातील एकमेव राज्य आहे.

रोजगार व स्वयंरोजगार विभागाची संघटना, कार्यालये, कार्य, संगणकीकरण व मनुष्यबळ, कंपल्सरी नोटिफिकेशन अँक्ट, १९५९ (C.N.V.Act), वेबसाईट मेन्टेनन्स इत्यादी सविस्तर माहितीकरिता या पेजवरील बटनावर क्लिक करा.

 
 
 
 
 
 
 
 
दर्शक क्रमांक 018019 अद्ययावत 01.05.2008
Disclaimer | Acknowledgement | Designed & Developed by 
All rights reserved.© 2005 Directorate of Employment and Self-Employment, Government of Maharashtra
Site optimized for 1024 X 768 monitor resolution, Best viewed in IE / Opera.