| इशारा व उपाय योजना
|
 |
रोजगार व स्वयंरोजगार यंत्रणेची सेवा विनामूल्य आहे. |
 | लाच देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे. |
 | लाच मागणारे ना कोणाचे मित्र असतात ना कोणाचे मदतगार. |
 | आपल्या कामाकरिता कोणी आपणाकडे लाच मागत असल्यास कृपया ठाम नकार द्या. |
 | लाच देणारा व घेणारा दोघेही शिक्षेस पात्र आहेत. |
 | कोणत्याही अमिषास बळी पडू नये त्याचे परिणाम शेवटी घातकच ठरतात. |
 | नोकरीच्या खोटया अमिषाला बळी पडू नका. |
 | तुमच्याकडून कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास हाती लेखनी धरा, अँटी करप्शन खात्याकडे तक्रार करा. |
 | खाजगी क्षेत्रातील अधिकारी / कर्मचारी अँटी करप्शन विभागाच्या कार्यकक्षेत येत नाही. |
 | तुम्हाला अँटी करप्शन खात्याविषयी अधिक माहिती हवी असल्यास 022-24921212 हा दूरध्वनी डायल करा. |
 | तक्रार केल्यानंतर तुमच्या तक्रारीची छाननी करून संबंधितांना रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला जाऊ शकतो. |
 | सापळा रचण्यासाठी तुम्ही अँटी करप्शन खात्यास लाच मागणा-या व्यक्तीचे नांव, वर्णन, लाचेचे स्वरूप व तपशील इ. तक्रारीबाबतची सविस्तर व अचूक माहिती कळविणे आवश्यक आहे. |
 | सापळा रचण्यात येणा-या ठिकाणी तुम्ही अँटी करप्शन अधिका-यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे न घाबरता सहकार्य करणे आवश्यक आहे. |
 | सापळा रचण्यापूर्वी अथवा नंतर कोणत्याही दबावास बळी पडू नये. |
 | अँटी करप्शन विभागाची स्वतंत्र वेबसाईट आहे. या वेबसाईटचा पत्ता www.acbmaharashtra.org आहे. |
 | वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता. तक्रार नोंदवण्यासाठी येथे क्लिक करा. |
 | तुम्ही तुमची तक्रार टोल फ्री क्रमांक 1800-222021 यावर करू शकता. |
|
| आपल्या मनात अनेक प्रश्न असतात. त्याची उत्तरे खालील विवेचनावरुन तुमच्या लक्षात येतील. |
 | कोणाविरूध्द तक्रार करता येते ? |
 | तक्रारीबाबत कोणती दक्षता घ्याल ? |
 | अँटी करप्शनकडे तक्रार केल्याचे फायदे |
 | तक्रारीचा होणारा परिणाम |
| कोणाविरूध्द तक्रार करता येते |
 |
सर्व शासकीय / निमशासकीय महामंडळे / नगरपालिका / महानगरपालिका / जिल्हा परिषदा / शासनाचे अनुदान घेणा-या सर्व संस्था यातील अधिकारी / कर्मचारी यांचे विरूध्द. |
 |
लोकप्रतिनिधींचे विरूध्द. |
| तक्रारीबाबत कोणती दक्षता घ्याल |
 |
तक्रारीची गुप्तता ठेवा. |
 |
ज्याच्या विरूध्द तक्रार करीत आहात, त्यास याबाबतची माहिती होऊ देऊ नका. |
 |
तक्रारीसंबंधीची माहिती असंबंधित व्यक्तिस सांगू नका. |
 |
तक्रारीबाबत दूरध्वनीवरून संपर्क करण्याऐवजी प्रत्यक्ष संबंधित कार्यालयात जा. |
 |
आपले तक्रार ते स्वतः लिहून घेतात. |
 |
राग आला असेल तरी धमकी अथवा कोणतेही इशारा वर्तन करू नका. |
 |
तक्रार अर्जाचे टायपिंग सार्वजनिक ठिकाणी करू नका. |
 |
तक्रार ज्याच्या विरूध्द आहे, त्याच्या संबंधित सर्व माहिती उदाहरणार्थ नांव, पद, कामाचे स्वरूप, कार्यालयाचे नांव, व त्यासंबंधीची कागदपत्रे, उतारे, माहिती, संबंधिताने मागणी केलेल्या लाचेची रक्कम, या सर्व बाबी अचूक असणे आवश्यक आहे. |
| अँटी करप्शनकडे तक्रार केल्याचे फायदे |
 |
काम लवकर होते. |
 |
अपूर्ण अवस्थेतील काम असेल तर अँटी करप्शनचे अधिकारी काम पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा करतात. |
 |
कोर्टात वारंवार हेलपाटे घालावे लागत नाहीत. |
 |
स्वतःचा वकील नेमण्याची आवश्यकता नसते. |
 |
लाचेची रक्कम परत मिळते. |
 |
तक्रारीची संपूर्ण गुप्तता पाळली जाते. |
 |
योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळते. |
| तक्रारीचा होणारा परिणाम |
 |
दोषी व्यक्तीस समाजात किंमत रहात नाही. |
 |
दोषी व्यक्तीस जिवंत असूनही मेल्यासारखे होते. |
 |
निकाल लागेपर्यंत मनस्ताप होतो. |
 |
दोषी ठरल्यास निवृत्तीचे कोणतेही आर्थिक लाभ मिळत नाहीत. |
|
|