ESE.PGM.C004<Registration at Employment Exchange > Department of Employment and Self Employment
मुखपृष्ट नोंदणीबाबत शुक्रवार 19-03-2010, 12:27 pm खाली
नांव नोंदणीकरीता सर्वसाधारण सुचना
रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयातील सर्व सेवा विनामूल्य आहेत. कोणत्याही बाहेरील व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
तुम्ही तुमची नोंदणी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात प्रत्यक्ष जाऊन करु शकता.
जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये नोंदणीकरीता तुम्ही तुमच्या शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला, अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला, इ. मूळ कागदपत्रे घेऊन यावीत.
वरील सर्व मूळ कागदपत्रे संगणकात नोंद केल्यानंतर तुम्हाला त्वरीत परत करण्यात येतील.
या प्रत्यक्ष नोंदणी करिता फोटो किंवा कोणत्याही प्रमाणपत्रांच्या छायाप्रतींची आवश्यकता नाही.
तुमची नोंदणी केलेली असल्यास कॉल करीता तुमच्या नांवाची पाठवणी जेष्ठतेनुसार केली जाते व तुम्हाला कॉल मिळू शकतो.
वरील सर्व गोष्टींचा विचार करता नांव नोंदणी करणे आवश्यक आहे.
तुम्ही तुमची नोंदणी वेबद्वारे, फिरते नांव नोंदणी पथकात, सेवायोजन कार्यालयात, आदिवासी उमेदवारांसाठी मार्गदर्शन केंद्रातही करु शकता.
तुमची नांव नोंदणी एकाच शैक्षणिक पात्रतेवर एकापेक्षा अधिक कार्यालयात आढळल्यास आधीची नोंदणी रद्द केली जाईल.
उदा. उमेदवाराने 10 वी पासची नोंदणी त्याच्या वास्तव्याच्या जिल्हा सेवायोजन कार्यालयात केलेली आहे. तरी पुन्हा 10 वी पासची नोंदणी इतर कोणत्याही जिल्ह्यात करु नये. तसे केल्यास जुनी जेष्ठता असलेली नोंदणी रद्द होईल.
वेब नोंदणी करिता 'वेब नोंदणी' या बटणावर क्लिक करा.
वेबनोंदणी व्यतिरिक्त इतर नोंदणी ठिकाणांच्या माहिती करिता संबंधीत बटणावर क्लिक करा.
वेबनोंदणी व्यतिरिक्त इतर ठिकाणी नोंदणीसाठी नोंदणी फॉर्मची आवशकता असते, सदरचा नोंदणी फॉर्म उपलब्ध करण्यासाठी या पेजवरील 'नोंदणी फॉर्म' बटणावर क्लिक करा
प्रत्यक्ष कार्यालयात नोंदणीसाठी उमेदवाराने स्वतः सर्व मूळ शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांसह उपस्थीत रहाणे आवश्यक आहे.
तुम्ही नोंदणी फॉर्मवर स्वतःची माहिती अचूक भरावी.
तुम्ही तुमचा संपर्काचा योग्य पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल पत्ता दिल्यास उद्योजकांना तुमच्याशी सहजपणे संपर्क करणे शक्य होईल.
केंद्र, राज्य शासकीय व निम शासकीय नोकरीसाठीचे कॉल जेष्ठतेनुसार पाठविले जातात म्हणून तुम्ही वेळेत नूतनीकरण केल्याने तुमची नोंदणीची जेष्ठता कायम राहील.

मुखपृष्ट | झटपट नोकरी | प्रश्नावली | चालु घडामोडी | उपयुक्त वेबसाईटस् | जाहिराती | मागे | वरती
Disclaimer | Acknowledgement | Designed & Developed By
All rights reserved with Directorate of Employment & Self-Employment , Government of Maharashtra
Site optimized for 1024 X 768 monitor resolution, Best viewed in IE / Opera.