मुखपृष्ट
इतर महत्वाचे
शुक्रवार 03-09-2010, 4:19 am खाली
शिका आणि कमवा
रोजगार प्रोत्साहन योजना अधिसुचित पदांच्या माहितीकरिता जिल्हा निवडा.
अप्रेंटिसशिप योजना अधिसुचित पदांच्या माहितीकरिता जिल्हा निवडा.
रोजगार प्रोत्साहन योजना / अप्रेंटिसशिप योजना परिपत्रके व शासन निर्णय माहितीकरिता येथे क्लिक करा.
तुम्ही शालेय शिक्षण घेतले मात्र तुमच्याकडे अनुभव नसल्याने तुम्ही मागे राहता.
अनुभव नाही म्हणून नोकरी नाही.
प्रशिक्षणातून अनुभव मिळेल असा मार्ग तुम्हाला माहिती आहे काय ?
असा मार्ग आहे. शिवाय तुम्हाला प्रशिक्षण कालावधीत ‘स्टायपेंड’ देखील मिळेल.
उद्योजक सुध्दा आपल्या परीने मदत करतात
म्हणजेच तुम्हाला ‘स्टायपेंड + उद्योजकांकडील वेतन + अनुभव = आपली एकंदर कमाई.’
अर्थात शिका आणि कमवा.
अनुभवाकरिता दोन मार्ग आहेत : एक “अप्रेंटीसशिप” आणि दोन “रोजगार प्रोत्साहन योजना”.
चला तर आता या योजनांची माहिती घेऊ....
अप्रेंटीसशिप
रोजगार प्रोत्साहन योजना
अप्रेंटीसशिप योजना :
अप्रेंटीसशिप कायदा, 1961 नुसार छोटया-मोठया सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी कंपन्या प्रशिक्षण देतात.
हे प्रशिक्षण किमान आठवी पास आणि कमाल पदवीधर उमेदवारांसाठी आहे.
तांत्रिक कौशल्यात अधिक वाढ होण्यासाठी किंवा उमेदवारांना अधिक सक्षम बनविण्यासाठी हे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण अप्रेंटीसशिप ट्रेनिंग या नावाने सुपरिचित आहे.
प्रशिक्षण कालावधीत स्टायपेंड मिळते.
प्रशिक्षणातून अनुभव मिळतो.
(कौशल्यात वाढ + अनुभव + आर्थिक फायदा) = शिका आणि कमवा अप्रेंटीसशिप योजना.
अप्रेंटीसशिप झालेल्या उमेदवारांना नोकरी मिळण्याच्या संधी वाढतात.
अटी व पात्रता :
शैक्षणिक पात्रता किमान 8 वी पास ते कमाल पदवी.
वय उमेदवाराचे वय 14 वर्षे पूर्ण असावे.
शारिरीक पात्रता उंची 157 सेंटीमीटर पेक्षा अधिक, वजन 25.4 किलो पेक्षा अधिक आणि दृष्टी चांगली असावी.
प्रशिक्षण कालावधी व्यवसायानुसार किमान सहा महिने ते चार वर्षे.
स्टायपेंड पहिल्या वर्षी रू. 820/- दुस-या वर्षी रू. 940/- तिस-या वर्षी रू. 1,090/- चौथ्या वर्षी रू. 1,230/-
भरती दरवर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यांत भरतीसाठी अर्ज विहित नमुन्यांत मागविण्यांत येतात. तसेच एम्प्लॉयमेंट व आय.टी.आय. कडून नावांची यादी मागविण्यात येते. ट्रेड अप्रेंटीस प्रशिक्षणासाठी भरती वर्षातून दोन वेळेस म्हणजेच फेब्रुवारी / ऑगस्ट या दोन सत्रांत केली जाते.
कॅम्पस इंटरव्ह्यू उद्योजक आय.टी.आय. केंद्रांमध्ये जाऊन लेखी परीक्षा, मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड करतात.
प्रशिक्षण प्रॅक्टीकल व थेरॉटीकल.
परिक्षा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेवटी लेखी परिक्षा घेण्यात येते.
फलनिष्पत्ती परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ‘प्रमाणपत्र’ देण्यांत येते. ही त्याची ‘Additional Qualification’ समजली जाते.
अधिक माहितीसाठी वेबसाईट. http://www.dvet.gov.in/
कोणामार्फत ही योजनाराबविण्यात येते ? व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या जिल्हास्तरावरील व तालुका स्तरावरील कार्यालयांमार्फत (आय.टी.आय.) ही योजना राबविली जाते.
रोजगार प्रोत्साहन योजना :
एम्प्लॉयमेंट मध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांना अनुभव मिळावा, त्याचबरोबर त्यांना रोजगार मिळावा, त्यासाठी ‘रोजगार प्रोत्साहन योजना’ आहे. ही योजना “ई.पी.पी.” या नावाने सुपरिचित आहे.
योजनेचे फायदे : 1. प्रशिक्षणातून अनुभव.
                      2. प्रशिक्षण घेत असतांना आर्थिक मदत.
                      3. प्रशिक्षण घेतलेल्यांना प्रशिक्षण देणारे उद्योजक आपल्या कंपनीत सामावून घेऊ शकतात व प्रशिक्षणार्थींना कायम नोकरी मिळू शकते.
या योजनेमध्ये उद्योजकांनी अधिसुचित केलेली पदे त्याचप्रमाणे योजनेच्या सविस्तर माहितीकरिता खाली क्लिक करा.
ठळक वैशिष्ठये :
उमेदवारांना अनुभव मिळण्यासाठी, त्या अनुभवातून नोकरी मिळण्यासाठी.
प्रशिक्षणासह आर्थिक फायदा.
केवळ एम्प्लॉयमेंट मध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी.
प्रशिक्षण असे जे ‘ऑन द जॉब’ आहे. उद्योजकांना पाहिजे ते कामगार निर्माण होतील इतपत सोपे व सोईचे.
सेवायोजन कार्यालयांत अनुभवाची नोंद घेण्यांत येते.
स्टायपेंड कोणाला, किती ? :
अ.क्र. पात्रता कमाल स्टायपेंड
1 एस.एस.सी. किंवा आय.टी.आय. किंवा पारंपारिक शिक्षित किंवा हस्तकला धारक. रू. 300/-
2 कला, विज्ञान किंवा वाणिज्य पदवीधर किंवा समतत्सम पदवीधर. रू. 500/-
3 इंजिनिअरींग टेक्नॉलॉजी, एग्रीकल्चर, व्हेटरनरी सायन्स, आर्किटेक्चर, फार्मसी, मेडीसीन इत्यादी डिप्लोमा धारक किंवा प्रोफेशनल कोर्सेस उत्तीर्ण. रू. 700/-
4 कला, विज्ञान किंवा वाणिज्य उच्च पदवीधर किंवा समतत्सम उच्च पदवीधर, किंवा व्दिपदवीधर. रू. 700/-
5 इंजिनिअरींग टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर पदवीधर. रू. 1,000/-
अधिसुचित पदांच्या माहितीत काय पहावयास मिळेल ?:
या योजनेखाली कोणत्या ‘उद्योजकाने’ मागणी केली आहे ?
किती रिक्त पदांसाठी ? त्यात एस.सी. / एस.टी. / माजी सैनिक / अपंग यांना किती पदे राखीव आहेत ?
त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वय काय आहे ? स्त्री उमेदवार घेण्यांत येतील काय ?
सरकारी स्टायपेंड शिवाय उद्योजक किती जास्तीचा पगार देणार आहेत ?
कोणत्या प्रकारचे ‘प्रशिक्षण’ देण्यांत येते ?
मुखपृष्ट | झटपट नोकरी | प्रश्नावली | चालु घडामोडी | उपयुक्त वेबसाईटस् | जाहिराती | मागे | वरती
Disclaimer | Acknowledgement | Designed & Developed By
All rights reserved with Directorate of Employment & Self-Employment , Government of Maharashtra
Site optimized for 1024 X 768 monitor resolution, Best viewed in IE / Opera.