मुखपृष्ट इतर महत्वाचे रविवार 21-03-2010, 8:04 am खाली
प्रश्नावली (FAQs)
FAQ : 1-10 of 62 [ Next ] [ Last ]
1  नाव नोंदणीला कार्यालयामध्ये किती वेळ लागतो?
2  कार्यालयातील नाव नोंदणीची वेळ कोणती?
3  मला सेवायोजन कार्यालयाचा काय फायदा आहे ?
4  नाव नोंदणी मला ग्रामीण भागामध्ये कशी करता येईल.
5  नाव नोंदणी करीता मला काय करावे लागेल.
6  नांव नोंदणीस किती वेळ लागेल ?
7  मला नांव नोंदणीचे ओळखपत्र मिळते का ?
8  ओळखपत्राचा मला काय फायदा होईल ?
9  एकदा नांव नोंदणी केल्यावर माझे कार्ड कधीपर्यंत सुरु राहते ?
10  माझे कार्ड केव्हा बंद होते ?
उत्तर
1  नाव नोंदणीसाठी लागणारी सर्व मूळ कागदपत्रे असल्यास नाव नोंदणी एका तासामध्ये केली जाते.  
2  सकाळी 10.00 ते 5.00 केव्हाही नोंदणी करता येते.  
3  तुम्हांला सेवायोजन कार्यालयामध्ये नाव नोंदणी केल्यामुळे रोजगार मिळू शकतो. तसेच स्वयंरोजगाराविषयीची माहिती मिळविण्याकरीता फायदा होऊ शकेल.  
4  तालुका पंचायत समितीमध्ये ठरलेल्या तारखेस दरमहा फिरते नोंदणी पथक येते. त्याठिकाणी करता य़ेईल. सायबर कॅफे अथवा घरूनही इंटरनेटद्वारे नाव नोंदणी करता येईल.  
5  सर्व मूळ प्रमाणपत्रे मार्कशीट, एखादे कौशल्य असल्यास तहसीलदाराचा दाखला, अपंग असल्यास सिव्हील सर्जनचे प्रमाणपत्र, अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र इ. दाखवून नोंदणीचा फार्म भरावा लागेल.  
6  जास्तीत जास्त एक तास लागू शकतो. नांव नोंदणी फॉर्म अचूक भरावा.  
7  होय. स्वत:चा फोटो असलेले ओळखपत्र मिळते.  
8  रोजगाराची जाहिरात येते त्यावेळेस नोंदणी क्रमांक द्यावा लागतो, स्वयंरोजगारासाठी आपण बेरोजगार आहात म्हणून पुरावा म्हणून नोंदणी कार्डाची झेरॉक्स द्यावी लागते. तसेच एम्प्लॉयमेंटमध्ये जेव्हा जेव्हा याल तेव्हा तेव्हा दाखवावे लागते म्हणजे मदत/माहिती मिळण्यास मदत त्वरीत होते.  
9  कार्ड 3 वर्षापर्यंत सुरु राहते. नोंदणी कार्डावर दिलेल्या तारखेस अथवा 2 महिने अगोदर वा नंतर 3 महिन्याने नूतनीकरण करुन सुरु ठेवावे लागते.  
10  रोजगार मिळाला, नूतनीकरण केले नाही, अथवा आपणांस एम्प्लॉयमेंट ऑफीसची गरज नाही असे लिहून दिले तर कार्ड बंद होते.  
Page : 1 2 3 4 5 6 7
मुखपृष्ट | झटपट नोकरी | प्रश्नावली | चालु घडामोडी | उपयुक्त वेबसाईटस् | जाहिराती | मागे | वरती
Disclaimer | Acknowledgement | Designed & Developed By
All rights reserved with Directorate of Employment & Self-Employment , Government of Maharashtra
Site optimized for 1024 X 768 monitor resolution, Best viewed in IE / Opera.