| शासकीय (हॉस्पिटल्स) दवाखाने, व महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद याच्या मार्फत चालविले जाणारे दवाखाने येथे बहुउद्देशीय आरोग्य सेवक भरती आवश्यकतेनुसार व नियमानुसार केली जाते. |
| ही भरती रिकाम्या होणा-या जागांनुसार व आवश्यकतेनुसार केली जाते. सध्या या पदांचीही वृत्तपत्रामध्ये जाहिरात देऊन व स्थानिक सेवायोजन कार्यालयाकडून उमेदवारांच्या नावांची यादी घेतली जाते. |
| आपल्याकडे ज्ञान आहे, कौशल्य आहे, आपली शरीरयष्टी चांगली आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड आहे ? समाजाबाबत सकारात्मक दृष्टीकोन आहे ? समाजामध्ये असणा-या आरोग्यविषयक तक्रारींची जाणीव आहे ? समाजामधील या समस्या चांगल्या रितीने सोडविण्याची तीव्र इच्छाशक्ती असेल तर मग चला बहुउद्देशीय आरोग्य सेवक भरती म्हणून स्वतःचे करिअर कसे बनविता येईल ते पाहू. |
|
| बहुउद्देशीय आरोग्य सेवक कसे होता येईल ? |
| त्यास कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ? |
| कोणती शैक्षणिक पात्रता व शारिरीक पात्रता आवश्यक आहे ? |
| बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदासाठी निवड होण्यासाठी निवड पध्दती काय आहे ? |
| ती कोठे, कशी व कधी होते ? |
| असे अनेक प्रश्न आपल्या मनात येऊन जातात. चला तर त्याची उत्तरे खालील मुद्यांवर क्लिक करून मिळवा. |
 | शैक्षणिक पात्रता |
 | शारिरीक पात्रता |
 | वयोमर्यादा |
 | नियुक्तीचा कालावधी |
 | निवड पध्दती |
 | अर्जाचा नमुना |
 | अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे |
 | पगार (वेतनश्रेणी) |
 | आरक्षण |
|
| शैक्षणिक पात्रता |
 |
एस.एस.सी. उत्तीर्ण. |
|
शासनाच्या मान्यताप्राप्त आरोग्य मान्यता प्राप्त एम.पी.डब्ल्यू / बी.एच.डब्ल्यू / एम.डब्ल्यू कोर्स उत्तीर्ण
|
|
आरोग्य निरिक्षक कोर्स उत्तीर्ण
|
| शारिरीक पात्रता |
|
शारिरीक व मानसिक दृष्टया तंदुरूस्त असावे.
|
| वयोमर्यादा |
|
किमान वयोमर्यादा 18 वर्षे व कमाल 33 वर्षे अशी राहील.
|
|
तसेच मागासवर्गीयांसाठी 38 वर्षे अशी राहील.
|
|
माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे अशी राहील.
|
|
शासन वेळोवेळी शासन निर्णयाव्दारे विहीत करील अशा वयोमर्यादा आरोग्य निरिक्षकाला आपोआप लागू होईल.
|
| नियुक्तीचा कालावधी |
|
नियुक्तीचा कालावधी हा प्रथम 3 महिन्यांसाठी असतो.
|
|
नियुक्ती ही कायम स्वरूपी सुध्दा केली जाते.
|
| निवड पध्दती |
|
निवड समिती अध्यक्ष / सचिव स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात देऊन प्राप्त झालेले अर्ज शिवाय पदांच्या संख्येनुसार जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडून, तसेच अनुसूचित जमातीच्या रिक्त पदांसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे कार्यालयांकडून प्राप्त झालेली यादी एकत्र करून गठीत केलेल्या समितीकडून उमेदवारांची निवड केली जाते.
|
|
निवड केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येते.
|
|
या मुलाखतीचे गुण अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जातात.
|
|
अशा उमेदवारांची खात्यामार्फत वैद्यकीय तपासणी केली जाते.
|
| अर्जाचा नमुना |
|
आरोग्य सेवक पदासाठी वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिध्द केली जाते.
|
|
तुम्ही वर्तमान पत्रामध्ये जाहिरातीचा जो नमुना दिलेला आहे त्या नमुन्यामध्ये व दिलेल्या विहित वेळेत नियुक्ती अधिका-यांकडे अर्ज सादर करावा.
|
|
अर्जासोबत काही कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल तर ती कागदपत्रे तुम्ही अर्जास जोडावीत.
|
|
अर्जातील प्रत्येक रकान्यातील माहिती काळजीपूर्वक भरून अर्ज सादर करावा.
|
|
सोबत तुमच्या माहितीसाठी अर्जाचा नमुना दिलेला आहे. तो पाहण्यासाठी येथे क्लिक करा. |
| पगार (वेतनश्रेणी) |
|
शासन सेवेत बहुउद्देशीय आरोग्य सेवक म्हणून नियुक्ती झालेल्या उमेदवारांना 5 व्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार रू. 4500-100-7000 अशी वेतनश्रेणी दिली जाते.
|
| आरक्षण |
|
शासकीय व निमशासकीय कर्मचारी भरतीसाठी विविध मागासवर्गीय संवर्गांसाठी जे आरक्षण निश्चित केले आहे, तेच आरक्षण शासन निर्णयानुसार आरोग्य निरिक्षकाला नियुक्तीसाठी लागू राहील.
|
|
आरक्षण निश्चित करतांना महिला / प्रकल्पग्रस्त / माजी सैनिक / अपंग इ. घटकांसाठी लागू असलेले समांतर आरक्षण सुध्दा शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या आदेशांप्रमाणे विचारात घेण्यात येईल.
|