मुखपृष्ट
अपंगांकरीता
शुक्रवार 03-09-2010, 4:21 am खाली
सवलती
अपंग व्यक्तिंकरिता शासनाकडून स्वयंरोजगार, प्रशिक्षण, पुर्नवसन तसेच नोकरीबाबतच्या सवलती देण्यात आलेल्या आहेत. याबाबतच्या अधिक माहितीकरिता खालील पर्यायांवर क्लिक करा.
स्वयंरोजगार योजना
प्रशिक्षण
पुनर्वसन
नोकरीबाबत सवलती
इतर सोयी-सवलती
शासन निर्णय

पुनर्वसन
मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्थामार्फत विशेष शाळा/कर्मशाळा -
         विशेष शाळामधून अंध, कर्णबधिर, अस्थिविकलांग व मनोविकलांग विद्यार्थ्यांना शालेय तसेच व्यवसाय          प्रशिक्षणाच्या सुविधा निवास व भोजनासह विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येतात.
अपंगांना उद्योगधंद्याकरिता आर्थिक सहाय्य -
         व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अपंगांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करणेसाठी या योजनेंतर्गत रुपये          १०००/- पर्यंत साधन सामग्रीच्या स्वरुपात आर्थिक मदत दिली जाते.
दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींच्या उन्नतीसाठी असलेल्या नागरी व ग्रामीण योजनांमधील एकूण निधीच्या ३ टक्के निधी अपंगांसाठी आरक्षित -
         अपंग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सदर निधीतून सहाय्य केले जाते.
अंध अपंगांना निवासासाठी वाणिज्यिक/औद्योगिक प्रयोजनासाठी विना लिलावाने जमीन देण्याबाबतचे धोरण
         अंध व अपंग व्यक्ति जर जोडधंदे करणार असतील तर त्यांना २०० चौ.फू. जमीन महसूल, सरकारी          जमीनीचे वितरण नियम १९७१ च्या नियम ३१ मधील तरतूदीनुसार एक खास बाब म्हणून विना          लिलावाने प्रचलित बाजारभावाने येणारे भोगाधिकार मूल्य आकारुन कब्जा हक्काने मंजूर करण्याची तरतूद आहे.
शिधा स्वस्त धान्य दुकाने मंजुरीकामी विचारात घ्यावयाच्या अग्रक्रम सुचीमध्ये अपंग व्यक्तींना प्राधान्य -
         अपंग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे हा उद्देश आहे.
आरे सरिता खाजगी संस्था/व्यक्तींना चालविण्यासाठीच्या वाटपात अपंग व्यक्तींना १० टक्के आरक्षण -
         अपंग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे हा उद्देश आहे.
जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, खारोडी नाका, विरार (पश्चिम), ता.वसई, जि.ठाणे.
         अपंगत्वाचा शोध घेणे, त्वरीत निदान, उपचार, शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन कार्याकरीता सदर केंद्र          कार्यरत आहे.
अपंगांकरिता राष्ट्रीय संस्था -
         अपंग व्यक्तींच्या पुनर्वसन कार्यक्रमासाठी केंद्र शासनाच्या चार राष्ट्रीय संस्था असून कर्णबधिरांसाठी          असलेली अलीयावर जंग नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हिअरिंग हॅण्डीकॅप्ड, बांद्रा (पश्चिम), मुंबई ४०००५० ही          संस्था कार्यरत आहे.
    1. National Institute for Hearing Handicapped (NIHH) Mumbai. (M.S.)
    2.National Institute for the Mentally Handicapped (NIMH) Secunderabad. (A.P.)
    3.National Institute for the Orthopaedically Handicapped (NIOH)Calcutta. (W.B.)
    4.National Institute for the Visually Handicapped (NIVH) Dehradun. (Uttaranchal)
आखिल भारतीय भौतिक चिकित्सा व पुनर्वसन केंद्र (All India Institute of Physical Medicine & Rehabilitation) -
         केंद्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत कार्यरत असलेल्या या संस्थेमध्ये अस्थिव्यंग अपंगांच्या पुनर्वसन          क्षेत्रातील प्रशिक्षण, अस्थिव्यंग अपंगांवर सुधारित शस्त्रक्रिया तसेच अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व          साधने बसविण्याचे कार्य केले जाते. ही संस्था हाजी अली पार्क, खाडी मार्ग, तुलसीवाडी, महालक्ष्मी,          मुंबई ४०००३४ येथे कार्यरत आहे.
१० अपंगांसाठी व्यावसायिक पुनर्वसन केंद्र -
         केंद्र शासनाच्या श्रम विभागामार्फत ए.टी.आय. कॅम्पस, व्ही.एन.पुरव मार्ग, सायन, मुंबई – 400 022          दृष्टीकोनातून मूल्यमापन करुन स्वयंरोजगारासाठी अल्प कालावधीचे प्रशिक्षण या केंद्रामार्फत दिले          जाते.
११ राष्ट्रीय अपंग पुनर्वसन कार्यक्रम -
         अपंगत्वाचा शोध घेऊन ग्रामपंचायत, गट व जिल्हा स्तरावर केंद्रामार्फत अपंग पुनर्वसन योजनेव्दारे          समाजाभिमुख पुनर्वसन संकल्पनेनुसार पुनर्वसन कार्यक्रमाची अंमलबजावणीकरीता ही योजना लातूर          , चंद्रपूर व नाशिक या जिल्ह्यात राबविली जात आहे.
    1. प्रकल्प समन्वयक, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, जीवन विकास प्रतिष्ठान, सिग्नल कॅम्प, मुकबधीर विद्यालय कम्पाऊंड, लातूर – दूरध्वनी क्रमांक – 02382-256723.
    2. समाज कल्याण अधिकारी (जिल्हा परिषद), कस्तुरबा रोड, जिल्हा परिषद, चंद्रपूर- 442401 दूरध्वनी क्रमांक – 07172-255933
    3. प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर, नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंडस, प्लॉट नं. पी-66, लेन नं.3, स्ट्रीट नं.1, एम.आय.डी.सी., सातपूर, नाशिक-7. दूरध्वनी क्रमांक –0253-2353578/2355378.
१२ ग्रामीण पुनर्वसन योजना -
         या योजनेंतर्गत औरंगाबाद, लातूर, बुलढाणा, वर्धा, कोल्हापूर व सिंधूदुर्ग येथे जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र          स्थापन करण्यात आले असून या केंद्राव्दारे अपंग व्यक्तींना मोफत अथवा अल्पदरामध्ये कृत्रिम अवयव व          साधने उपलब्ध करुन देण्यात येतात.
    1. केंद्र प्रमुख, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, लिंब फिटींग सेंटर, ज्युबिली पार्क, औरंगाबाद.
    2. प्रकल्प समन्वयक, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, जीवन विकास प्रतिष्ठान, सिग्नल कॅम्प, मुकबधीर विद्यालय कम्पाऊंड, लातूर – दूरध्वनी क्रमांक – 02382-256723.
    3. केंद्र प्रमुख, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, व्दारा – जिल्हा सामान्य रूग्णालय परिसर, बुलढाणा.
    4. नोडल अधिकारी, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, ओल्ड कस्तुरबा आयुर्वेदिक हॉस्पिटल, सेवाग्राम, ता. जि. वर्धा.
    5. जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, मध्यवर्ती शासकीय इमारत, तळमजला, कसबा बावडा, ता. करवीर, जि. कोल्हापूर.
    6. प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर, नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंडस, प्लॉट नं. पी-66, लेन नं.3, स्ट्रीट नं.1, एम.आय.डी.सी., सातपूर, नाशिक-7. दूरध्वनी क्रमांक –0253-2353578/2355378.
वरती
नोकरीबाबत सवलती
शासकीय सेवेत आरक्षण
वयोमर्यादेत शिथिलता
सेवायोजन नोंदणी
अपंगासाठी स्वतंत्र उद्योग विनिमय केंद्र योग विनिमय केंद्र
अंधांना संगीत शिक्षक पदासाठी प्राधान्य
रिकेनिंगकरिता अंधांना प्राधान्य पदासाठी प्राधान्य
विशेष वाहन भत्ता
कार्यालयीन वेळेत सवलत
व्यवसाय करात सूट
सामाजिक अत्याचारामुळे अपंग झालेल्यांच्या कुटुंबातील व्यक्तिची नियुक्ती
अपंगांची नियुक्ती / बदली / पदोन्नती / राहत्या ठिकाणाजवळ
शासकीय सेवेत आरक्षण
अंध, मुक-बधीर आणि अस्थिव्यंगाने अपंग यांच्याकरिता शासकीय तथा स्थानिक स्वराज्य संस्था व सार्वजनिक उपक्रमातील सेवेमध्ये ३ टक्के पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. -3 वर्ग-4च्या सेवेमध्ये 3 प्रतिशत पदे राखीव ठेवण्यात आली आहेत.
वयोमर्यादेत शिथिलता
शासकीय सेवेत, स्थानिक स्वराज्य संस्थेतील वर्ग-१ ते वर्ग-४ या पदाच्या सरळसेवा भरतीकरिता वयोमर्यादा ४५ वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा लागू आहेत. अशा पदधारक अपंगास या परिक्षेस बसण्यातही वयोमर्यादा 5 वर्ष शिथिल केली आहे.
सेवायोजन नोंदणी
सेवा योजन कार्यालयात अपंगाकरिता विशेष सेवायोजन नोंदणीची व्यवस्था आहे. तंत्रशिक्षण व प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांची नोंदणी केली जाते. याशिवाय पदव्युत्तर परिक्षा उत्तीर्ण अपंग उमेदवार संबंधित विद्यापिठाच्या सेवायोजन विभागात नाव नोंदणी करु शकतात. मेदवार संबंधित विद्यापिठाच्या सेवायोजन विभागात नाव नोंदणी करु शकतात.
अपंगासाठी स्वतंत्र उद्योग विनिमय केंद्र योग विनिमय केंद्र
अपंगांना नोकरी उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारने देशात निरनिराळ्या ठिकाणी अपंगांसाठी स्वतंत्र उद्योग विनिमय केंद्रे स्थापन केली आहेत. अशी केंद्रे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात रोजगार कार्यालयात कार्यरत आहेत. मय केंद्रे स्थापन केली आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे येथे कार्यरत आहे.
अंधांना संगीत शिक्षक पदासाठी प्राधान्य
शासन शिक्षण व समाज कल्याण विभाग परिपत्रक क्र.इ.डी.डी./1065/134655/ब 10 सप्टेंबर 1966 नुसार शासकीय, अशासकीय तथा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत अर्हता प्राप्त अंधांना गायन, वादन, शिवणकला शिक्षकांच्या जागेवर नेमण्यास प्राधान्य दिले जाते. रताना टंकलेखनापासून सूट देण्यात येते.
रिकेनिंगकरिता अंधांना प्राधान्य पदासाठी प्राधान्य
शासकीय कार्यालयातील खुर्च्यांना रिकेनिंग करण्याकरिता अंध व्यक्तिंना प्राधान्य देण्याबाबत आणि ज्या ठिकाणी केनिंगचे काम भरपूर आहे अशा कार्यालयात “चेअर रिकेनर ” चे पद निर्माण करण्यासंबंधित शासनाच्या सूचना आहेत. (शा.नि.जी.ए.डी.क्र.-एस.आर.व्ही. – 1081/3273/सोळा-ए (दिनांक 10 सप्टेंबर 1981) ्त अंधांना गायन, वादन, शिवणकला शिक्षकांच्या जागेवर नेमण्यास प्राधान्य दिले जाते.
विशेष वाहन भत्ता
महा.शा.नि.क्र.टी.आर.ओ – 1083 सी.आर-5, दिनांक 4 जानेवारी 1984 नुसार अंध, अस्थि व्यंगामुळे अधू असलेल्या शासकीय, निमशासकीय, कर्मचा-यांना वाहन भत्ता देण्यात येतो. सद्यस्थितीत किमान दरमहा रुपये ५००/- अथवा सामान्य कर्मचा-याच्या दुप्पट किंवा कमाल रुपये १६००/- यापैकी जो कमी असेल तो विशेष वाहन भत्ता दिला जातो.नाच्या सूचना आहेत. (शा.नि.जी.ए.डी.क्र.-एस.आर.व्ही. – 1081/3273/सोळा ए दिनांक 10 सप्टेंबर 1981)
कार्यालयीन वेळेत सवलत
महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय कार्यालयात काम करणा-या अंध अथवा कमीत कमी 40 प्रतिशत कायमचे /अंधत्व असलेल्या अपंग कर्मचा-यांना कार्यालयामध्ये येण्याकरिता सकाळी अर्धा तास किंवा संध्याकाळी अर्धा तास सवलत देण्यात येते.
व्यवसाय करात सूट
विक्रीकर आयुक्त मुंबई यांचे 1987 मधील परिपत्रक क्र. 11 दिनांक 13-7-1987 नुसार अपंगांना व्यवसाय करापासून सूट देण्यात आली आहे.
सामाजिक अत्याचारामुळे अपंग झालेल्यांच्या कुटुंबातील व्यक्तिची नियुक्ती
सामाजिक अत्याचारामुळे मागासवर्गीय कुटुंबातील एखादी व्यक्ति मृत किंवा अपंग झाली असल्यास, या कुटुंबातील एका व्यक्तिला प्राधान्य देऊन शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्था यांच्या कार्यालयातील वर्ग-3 व वर्ग-4 किंवा तत्सम पदावर नियुक्ती करण्यात यावे असा शासन निर्णय आहे.
अपंगांची नियुक्ती / बदली / पदोन्नती / राहत्या ठिकाणाजवळ
महा.शा.परि क्र.-एस आर व्ही 1081/147/सी आर/74/16-3 दिनांक 7 ऑक्टोबर 1987 शासन निर्णयाप्रमाणे प्रशासकीय सोयीनुसार शक्य असल्यास शारीरिक दृष्ट्या अपंग उमेदवारांची शासकीय सेवेत नियुक्ती / बदली / पदोन्नती करतेवेळी सहानुभूती दृष्टीकोन ठेवून त्याच्या राहत्या ठिकाणाजवळ किंवा आसपास एक सवलत म्हणून अपंग व्यक्तिची नियुक्ती / बदली / पदोन्नती करण्याचा विचार व्हावा अशा शासनाकडून सूचना दिलेल्या आहेत.
वरती
इतर सोयी-सवलती
अपंग योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वेळी अपंगत्वाचा दाखला मिळविण्याचा त्रास अपंग व्यक्तींना होऊ नये म्हणून समाज कल्याण अधिकारी (जिल्हा परिषद) यांचेमार्फत अपंग व्यक्तींना ओळखपत्र देण्यात येते. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न असलेल्या वैद्यकीय अधीक्षक यांचे मूळ प्रमाणपत्र, वयाचा दाखला / जन्मतारखेचा किंवा शाळेचा दाखला, रेशनकार्ड झेरॉक्स/रहिवासी दाखला, दोन पासपोर्ट साईज फोटो यासह अर्ज करावा.
अपंग व मंदबुध्दी मुलांच्या करीता चालविण्यात येणा-या शैक्षणिक संस्थांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंडाचे नाममात्र दराने वाटप करण्याची
अपंग व्यक्तीला मोटार वाहन कर अधिनियम १९५८ च्या कलम १३ मधील उपकलम २ नुसार अपंग व्यक्तीस अपंगत्वानुरुप सोईस्कर असे बदल करुन घेतलेल्या वाहनास मोटार वाहन करातून सवलत देण्यात येते.
एक अथवा दोन्ही हातामध्ये किंवा पायामध्ये पुर्णतः अपंगत्व, स्पास्टीक, पुर्णतः मुकबधिर, पुर्णतः कर्णबधिर व पुर्णतः अंध अपंग व्यक्तींना व्यवसाय करातून सूट आहे.
मतिमंद पाल्याच्या आई वडिलांना व्यवसाय करातून सूट देण्यात आली आहे.
केंद्र शासनाची सर्व प्रकारचे पेट्रोल, रसायने, तेल इ. विक्रेते व एजंट नेमणुकीच्या ७.५ प्रतिशत विक्रेते व एजंट नेमण्यासंबंधिच्या यादीत अपंग व्यक्तींचा समावेश आहे.
भारत दूरसंचार निगम मार्फत सार्वजनिक टेलिफोन बुथचे वितरण करताना अपंग व्यक्तीस प्रथम प्राधान्य देण्यात येते.
अपंगांना आवश्यक असलेली उपकरणे, वाहन, इ. परदेशातून आयात करताना त्यावर लागणारी कस्टम ड्यूटी माफ करण्यात आली आहे.
      अन्य सवलतीसाठी येथे क्लिक करा.
    1. http://dget.nic.in/cirtes/csc/CSC-division.htm
    2. http://www.socialjustice.nic.in/disabled/welcome.htm
वरती
शासन निर्णय
अ.क्र.विभाग विषयशासन निर्णय क्रमांक व दिनांक
1सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्यदृष्टीहीन, अल्पदृष्टी आणि अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सीने बाधित झालेल्या व्यक्ती लिहीण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परिक्षेसाठी लेखनिक पुरविणेबाबत.अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांचेकडील परिपत्रक क्र. अकआ/प्र-7/लेखनिक/सुविधा/2006-07/2951, दि.20 डिसेंबर, 2006.

मुखपृष्ट | झटपट नोकरी | प्रश्नावली | चालु घडामोडी | उपयुक्त वेबसाईटस् | जाहिराती | मागे | वरती
Disclaimer | Acknowledgement | Designed & Developed By
All rights reserved with Directorate of Employment & Self-Employment , Government of Maharashtra
Site optimized for 1024 X 768 monitor resolution, Best viewed in IE / Opera.