मुखपृष्ट मोठ्या भरतीची कार्यपद्धती रविवार 21-03-2010, 7:42 am खाली
पशुधन पर्यवेक्षक पदाभरती
       महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात पशुधन पर्यवेक्षकांची (लाईव्ह स्टॉक सुपरवायझरची) भरती आवश्यकतेनुसार व नियमानुसार केली जाते.
       ही भरती रिकाम्या होणा-या जागांनुसार व आवश्यकतेनुसार केली जाते. पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) या पदासाठी वृत्तपत्रात जाहिरात देऊन व स्थानिक सेवायोजन कार्यालयाकडून उमेदवारांच्या नावाची यादी घेतली जाते.
       आपल्याकडे ज्ञान आहे, तांत्रिक कौशल्य आहे, पशुधन व पशुसंवर्धनासंबंधी चांगली माहिती आहे, तर मग चला पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) म्हणून स्वतःचे करिअर कसे बनविता येईल ते पाहू.
    पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) कसे होता येईल?
    त्यास कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे?
    कोणती शैक्षणिक पात्रता व शारिरीक पात्रता आवश्यक आहे?
    पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) या पदासाठी निवड होण्यासाठी निवड पध्दती काय आहे?
    ती कोठे, कशी व कधी होते?
असे अनेक प्रश्न आपल्या मनात येउन जातात. तर चला त्याची उत्तरे खालील मुद्दयावर क्लिक करुन मिळवा.
शैक्षणिक पात्रता
वयोमर्यादा
नियुक्तीचा कालावधी
निवड पध्दती
अर्जाचा नमुना
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे
पगार (वेतनश्रेणी)
आरक्षण
शैक्षणिक पात्रता
       पशु संवर्धन विभाग यांच्याकडील सेवाभरती नियमानुसार विहीत केल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे -
माध्यमिक शालांत परीक्षा उतीर्ण झाल्यानंतर.
पशु संवर्धन संचालनालय
महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषी विद्यापीठे
महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठे
किंवा
महाराष्ट्र राज्याचे तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ
महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषी विद्यापीठे
महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठे
यांपैकी कोणत्याही एका संस्थेकडील दोन वर्षांचा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण.
जे उमेदवार महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषी विद्यापीठाची किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाची बी. व्ही. एस. सी. किंवा बी. व्ही. एस. सी. अँड एनिमल हजबंड्री पदवी धारण करीत असतील, अशा उमेदवारांना पसंतीक्रम देण्यात येईल.
वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा 18 वर्षे व कमाल 33 वर्षे अशी राहील.
तसेच मागासवर्गीयांसाठी 38 वर्षे अशी राहील.
शासन वेळोवेळी शासन निर्णयाव्दारे विहीत करील अशा वयोमर्यादा पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) साठी आपोआप लागू होईल.
नियुक्तीचा कालावधी
नियुक्ती प्रथम तात्पुरती 3 महिन्यांसाठी केली जाते.
प्रथम तात्पुरती व एक वर्षानंतर कायम नियुक्ती केली जाते.
नियुक्ती ही कायम स्वरूपी सुध्दा केली जाते.                                                           वरती
निवड पध्दती
निवड समितीचे अध्यक्ष / सचिव हे स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात देऊन, प्राप्त झालेले अर्ज, शिवाय पदांच्या संख्येनुसार जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडून, तसेच अनुसूचित जमातीच्या रिक्त पदांसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे कार्यालयांकडून यादी प्राप्त करुन घेतात.
प्राप्त झालेली यादी एकत्र करून गठीत केलेल्या निवड समितीमार्फत लेखी परीक्षा व त्यानंतर मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड केली जाते.
लेखी परिक्षेचे मार्कस् व मुलाखतीचे मार्कस् एकत्र करून गुणानुक्रमे उमेदवारांची अंतीम निवड व प्रतिक्षा यादी तयार केली जाते.
अशा उमेदवारांची खात्यामार्फत वैद्यकीय तपासणी केली जाते व नंतर नेमणूक देण्यात येते.
अर्जाचा नमुना
पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) पदासाठी वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिध्द केली जाते.
तुम्ही वर्तमान पत्रामध्ये जाहिरातीचा जो नमुना दिलेला आहे त्या नमुन्यामध्ये व दिलेल्या विहित वेळेत नियुक्ती अधिका-यांकडे अर्ज सादर करावा.
अर्जासोबत काही कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल तर ती कागदपत्रे तुम्ही अर्जास जोडावीत.
अर्जातील प्रत्येक रकान्यातील माहिती काळजीपूर्वक भरून अर्ज सादर करावा.
सोबत तुमच्या माहितीसाठी अर्जाचा नमुना दिलेला आहे. तो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.          वरती
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे
शाळा सोडल्याचा दाखला, 10 वी (एस.एस.सी.) गुणपत्रिका व प्रमाणपत्र, आणि इतर शैक्षणिक पात्रतेच्या दाखल्याच्या प्रमाणित केलेल्या प्रती.
पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण किंवा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका किंवा बी. व्ही. एस. सी. किंवा बी. व्ही. एस. सी. अँड एनिमल हजबंड्री पदवी गुणपत्रिका व प्रमाणपत्राच्या प्रमाणित केलेल्या प्रती.
सेवायोजन कार्यालयाचे नोंदणी कार्ड.
वर्तणुकीबाबतचे दोन दाखले.
मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत प्राधिकृत अधिका-याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची राजपत्रित अधिकारी यांनी प्रमाणित केलेली सत्यप्रत.
उमेदवार प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त / भूकंपग्रस्त / माजी सैनिक असल्यास त्याबाबत प्राधिकृत अधिका-याच्या दाखल्याची प्रमाणित सत्यप्रत.
पगार (वेतनश्रेणी)
शासन सेवेत पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) म्हणून नियुक्ती झालेल्या उमेदवारांना 5 व्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार रू. 4000-100-6000 अशी वेतनश्रेणी दिली जाते.
आरक्षण
शासकीय व निमशासकीय कर्मचारी भरतीसाठी विविध मागासवर्गीय संवर्गांसाठी जे आरक्षण निश्चित केले आहे, तेच आरक्षण शासन निर्णयानुसार पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) पदाच्या नियुक्तीसाठी लागू राहील.
आरक्षण निश्चित करतांना महिला / प्रकल्पग्रस्त / माजी सैनिक / अपंग इ. घटकांसाठी लागू असलेले समांतर आरक्षण सुध्दा शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या आदेशांप्रमाणे विचारात घेण्यात येईल.
मुखपृष्ट | झटपट नोकरी | प्रश्नावली | चालु घडामोडी | उपयुक्त वेबसाईटस् | जाहिराती | मागे | वरती
Disclaimer | Acknowledgement | Designed & Developed By
All rights reserved with Directorate of Employment & Self-Employment , Government of Maharashtra
Site optimized for 1024 X 768 monitor resolution, Best viewed in IE / Opera.