ESE.PGM.C023< Free Classes For competitive Examinations : Only for Tribals / Adivasis > Department of Employment and Self Employment
मुखपृष्ट इतर महत्वाचे शनिवार 13-03-2010, 1:03 pm खाली
आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षांकरिता मोफत कोचिंग क्लासेस
आदिवासी व दुर्गम भागातील उमेदवारांना शासकीय नोकरी मिळण्याकरिता स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, सामान्य ज्ञान, बुध्दीमापन चाचणी, त्यांचे व्यक्तिमत्व विकसन तसेच मुलाखत कशी द्यावी, याबाबत माहिती, मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याकरिता
मोफत कोचिंग क्लासेस
 
आदिवासी उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षांबाबत प्रशिक्षण दिले जाते.
प्रशिक्षण घेणा-या प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतनाची सोय व मोफत पुस्तके दिली जातात.
या केंद्रात सर्व उमेदवारांच्या सोईसाठी नांव नोंदणी, नुतनीकरण, शैक्षणिक पात्रता वाढ इत्यादि कामे होतात.
 
कामकाजाची वेळ सकाळी ११ ते ४ (शासकीय सुट्टी वगळुन)
 

ठळक वैशिष्ठये

प्रवेशा करिता पात्रता किमान १० वी उतीर्ण, वय वर्षे – १८ पूर्ण केलेल्या आदिवासी उमेदवारास महाराष्ट्रातील कोणत्याही केंद्रात प्रवेश दिला जातो.
सत्राचा कालावधी१ एप्रिल ते १५ जुलै,
१ ऑगस्ट ते १५ नोव्हेंबर,
१ डिसेंबर ते १५ मार्च.
सवलती आणि विद्यावेतन विद्यावेतन दरमहा रूपये – १०००/- दिले जाते.उमेदवारांना नावनोंदणीची सुविधा उपलब्ध.
संगणक प्रशिक्षण स्पर्धा परीक्षेकरिता व विविध विषयांच्या अभ्यासाकरिता उमेदवारांना पुस्तके, प्रश्नपत्रिका संच, वृत्तपत्रे इ. उपलब्ध करून दिली जातात.
रोजगार मार्गदर्शनाबरोबरच स्वयंरोजगाराचे तज्ञांकडून मार्गदर्शन.
अनुभवी प्राध्यापक वर्ग.
प्रवेश पध्दती व प्रशिक्षणाचा हेतू अर्जदाराने प्रत्येक वर्षाच्या मार्च, सप्टेंबर, नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक प्रशिक्षण केंद्रात स्वतःच्या हस्तलिखित अर्ज करावयाचा असतो.
इच्छुक उमेदवारांचे प्रवेश अर्ज सत्र सुरू होण्यापूर्वी केंद्रातच भरून घेतले जातात.
प्रवेशाकरिता प्रवेश परीक्षा नाही.
थेट मुलाखतीव्दारे उमेदवारांची निवड केली जाते.
शासकीय नोकरीकरिता, स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करून पूर्वतयारी करून घेणे.
प्रशिक्षणाअंतर्गत शिकविले जाणारे विषय सामान्य ज्ञान
बुध्दीमापन
इंग्लीश
गणित
मुलाखत तंत्र इ.
प्रशिक्षणानंतरच्या संधी पदवीधर असल्यास लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांतून निवड झाल्यास वर्ग-१, वर्ग-२ च्या पदावर नियुक्ती.
वर्ग-३ च्या सर्व शासकीय सेवा करिता असलेल्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन सेवा करण्याची संधी मिळू शकते.
त्याचबरोबर बँका, भारतीय रेल्वे यांमध्ये जाहिरातीव्दारे सेवेची संधी मिळू शकते.

मोफत कोचिंग क्लासेसच्या कार्यालयाचे नांव व पत्ते यासाठी ' पुढे ' या बटणावर क्लिक करा.
मुखपृष्ट | झटपट नोकरी | प्रश्नावली | चालु घडामोडी | उपयुक्त वेबसाईटस् | जाहिराती | मागे | वरती
Disclaimer | Acknowledgement | Designed & Developed By
All rights reserved with Directorate of Employment & Self-Employment , Government of Maharashtra
Site optimized for 1024 X 768 monitor resolution, Best viewed in IE / Opera.