 |
तुमच्या कार्डाचे नुतनीकरण नोंदणी केल्याच्या महिन्यापासून 3 वर्षानंतर असते. |
 |
तुमच्या नोंदणीच्या नुतनीकरणाकरीता कालावधी एकूण 6 महिन्यांचा आहे. |
 |
तुमच्या नोंदणीस 3 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी दोन महिने अगोदर किंवा नोंदणीच्या महिन्यात किंवा नोंदणीच्या महिन्याच्या पुढील सलग तीन महिन्यांच्या आत तुम्ही तुमच्या नोंदणीचे नुतनीकरण करू शकता. |
 |
केंद्र, राज्य शासकीय व निमशासकीय नोकरीसाठीचे कॉल जेष्ठतेनुसार पाठविले जातात म्हणून तुम्ही वेळेत नुतनीकरण केल्याने तुमची नोंदणीची जेष्ठता कायम राहील. |
 |
नोंदणी कार्डाचे नुतनीकरणाचा कालावधी तुमच्या नोंदणी कार्डाच्या कॉलम नंबर 2 मध्ये पहावा. |
 |
तुमचे नोंदणी कार्डाचे नुतनीकरण मोबाईल नोंदणीच्या ठिकाणी किंवा पोस्टाद्वारे करण्यासाठी रु. 5/- ची पोस्टाची तिकीटे लावलेला 4 x 9 इंच आकाराचा स्वतःचा पत्ता लिहीलेला लिफाफा दिल्यास आपणास नुतनीकरण केलेले कार्ड घरपोच 15 दिवसांचे आत प्राप्त होईल. |