| नांव नोंदणी केली, अनुभव नोंदविला, दर तीन वर्षांनी नुतनीकरण केले आता तरी कॉल द्या. पण उत्तर मिळते कॉलसाठी तुमची ज्येष्ठता अद्याप आली नाही. तर चला जाणुन घेऊ, काय आहे ही ज्येष्ठता व कॉलसाठी कशी गणली जाते? |
| सेवायोजन कार्यालयात प्रथम नोंदणीची तारीख म्हणजेच जेष्ठता होय. |
| सेवायोजन कार्यालयात प्रथम नोंदणी करणा-यास प्रथम संधी या तत्वावर कॉल दिले जातात. |
| नोंदणी करणारा प्रत्येक उमेदवार हा सारख्या शैक्षणिक पात्रतेचा, वयाचा, जातीचा तसेच तुमच्यासारखा अनुभव घेतलेला नसतो. त्यामुळे तुमच्या नंतर नोंदणी केलेल्या उमेदवारांची जेष्ठता ही तुमच्या पुढे किंवा मागे जाऊ शकते. |
| सेवायोजन कार्यालयात कॉल देण्यासाठी जेष्ठता ठरविताना खालील बाबी विचारात घेतल्या जातात. या बाबी जेष्ठतेवर कसा परिणाम करतात हे जाणून घेण्यासाठी खालील मुद्दयांवर क्लिक करा. |
 | नोंदणीचा दिनांक |
 | वय |
 | अनुभवाची नोंद |
 | विशिष्ठ विषय |
 | गुणांची टक्केवारी |
| राहण्याचा पत्ता |
| तुम्ही वरील बाबींची नोंद केलेली आहे तरी अशाच प्रकारची नोंद केलेल्या तुमच्यासारख्या इतर उमेदवारांना कॉल मिळावा यासाठी खालील पध्दत अवलंबिण्यात येते.
|
| तुमची नोंदणीची जेष्ठता विचारात घेऊन तुम्हाला |
कायम नोकरीच्या तीन संधी |
पोलीसाकरिता इच्छुक असल्यास एक संधी |
तात्पुरत्या नोकरीच्या सहा संधी |
| अशा एकूण दहा संधी दिल्यानंतर तुमच्या नंतरच्या जेष्ठतेत असलेल्या उमेदवारांना अशाच प्रकारच्या कॉलच्या संधी दिल्या जातात. या प्रमाणे तुमच्या सारखीच पात्रता असलेल्या सर्व उमेदवारांना कॉल मिळाल्यानंतर पुनःश्च तुम्हाला वरीलप्रमाणे कॉलची संधी मिळते. हे वर्तुळ अशा प्रकारे चालू राहते म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त कॉल मिळण्याकरिता, तुम्ही तुमची शैक्षणिक पात्रता, अनुभव, कौशल्य, प्रशिक्षण तसेच तुमच्या वैयक्तिक माहितीत झालेला बदल इ. ज्या त्या वेळी सेवायोजन कार्यालयात नोंदवाव्यात. |
| नोंदणी दिनांक | सेवायोजन कार्यालयात प्रथम नोंदणी केल्यानंतर पुढे वेळोवेळी तुम्ही तुमच्या वाढलेल्या शैक्षणिक, व्यावसायिक तथा अनुभवाधारित नोंदणी करीत असता व त्यानुसार त्या-त्या अर्हतेकरिता संबंधित नोंदणीच्या दिनांकानुसारच तुमची स्वतंत्र जेष्ठता निश्चित होते.उदाहरणार्थ अ) तुमची प्रथम नोंदणी ही १० वी उत्तीर्ण झाल्याबाबतची असून दिनांक १-१-१९९५ ला नोंदणी केली आहे. याचा अर्थ १० वी या शैक्षणिक पात्रतेनुसार ज्या नोकरीबाबतच्या शिफारशी रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडून केल्या जातील त्याकरिता तुमची जेष्ठता ही वरील नोंदणी दिनांक १-१-१९९५ अशी असेल. |
| जातीचा प्रवर्ग | उद्योजकाने एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये काही ठराविक जातीच्या प्रवर्गातील उमेदवार मागितले आहेत अशावेळी सदर उमेदवारांचीच नोंदणी तपशिलानुसार जेष्ठता निश्चित केली जाते म्हणजेच समान पदांकरिता उदा. क्लार्क-कम-टायपिस्ट शैक्षणिक व्यावसायिक पात्रता जरी एकच असली तरी वेगवेगळ्या प्रवर्गांकरिता जातीनुसार जेष्ठता वेगवेगळी असते जर तुम्ही मागासवर्गीय आहात व नोंदणी करतेवेळी तुमच्या जातीचे प्रमाणपत्र नसल्यास आपली नोंदणी ही सर्वसाधारण म्हणून केली जाईल तदनंतर आपल्या शैक्षणिक पात्रतेची व प्रवर्गाची जर मागणी आली तर पाठवणी करताना तुमच्या नावाची शिफारस आपण जेष्ठतेत असून देखील होणार नाही तरी तुम्ही तुमच्या जातीच्या प्रवर्गाची नोंदणी वेळेवर केल्यास तुम्हाला कॉल मिळू शकेल. |
| वय | जेष्ठता निश्चित करण्याचा अजून एक महत्वाचा निकष म्हणजे वयाची अट. राज्य तथा केंद्र शासन निमशासकीय आस्थापना तथा अंगिकृत महामंडळे यांचेकडे वेगवेगळ्या जातीच्या प्रवर्गानुसार वयाची अट निश्चित आहे. उदा. सद्यस्थितीत शासन निर्णय एआरव्ही-2004/प्र.क्र.19/2004/12, दिनांक 17 ऑगस्ट 2004 अन्वये शासकीय, निमशासकीय या आस्थापनेवरील पदांकरिता सर्वसाधारण उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे आहे व मागासवर्गीय उमेदवारांकरिता ३८ वर्षे आहे. खाजगी उद्योजकही प्रशिक्षणार्थी उमेदवारांकरिता विशिष्ट वयोमर्यादेची अट ठेवतात अशावेळी जेष्ठता ठरविताना उमेदवाराचे शिक्षण, अनुभव, नोंदणी दिनांक या इतर तपशिलाबरोबर वयोमर्यादा हा महत्वाचा निकष असणे स्वाभाविक आहे व जर का आपले वय मर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर जेष्ठतेचे इतर सर्व निकषांत बसत असूनही आपली पाठवणी होणार नाही. |
| कामाचा अनुभव | सेवायोजन कार्यालयात ब-याच वेळा उद्योजक हे अनुभवी उमेदवारांची मागणी करीत असतात. मागणीमध्ये कळविलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक तसेच संगणक परिक्षा उतीर्ण या पात्रता तुमच्याकडे असतात. याशिवाय सदर पात्रतेच्या तुमच्या रजिस्ट्रेशन दिनांकानुसार तुम्ही कॉलसाठी पात्र आहात मात्र तुमचे नांव पाठविले गेलेले नाही, याचे कारण उद्योजकाने ठराविक कालावधीचा उदा. ३ वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार मागितलेले आहेत व तुमच्याकडे तसा अनुभव नाही किंवा त्यापेक्षा कमी अनुभव आहे त्यामुळे तुमचे नांव पाठविले नाही म्हणजेच तुमच्याकडे विहीत अनुभव नसल्याने आपण सिनिऑरिटीत बसत नाहीत.वरील नुसार एक महत्वाची बाब आपल्या लक्षांत येईल ती अशी की तुम्ही तुमच्या कामाच्या अनुभवाची सर्व प्रमाणपत्रे वेळोवेळी सेवायोजन कार्यालयात नोंदविणे आवश्यक आहे. तुम्ही वेळच्या वेळी तुमच्या कामाचा अनुभव नोंदविल्यास तुम्हाला कॉल मिळू शकेल. |
| विशिष्ट विषय | अनेकदा उद्योजक एम्प्लॉमेंट एक्सचेंजकडे एखाद्या पदाकरीता ठराविक विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या अथवा ठराविक स्ट्रींगचे उमेदवार मागतात.उदा. बीकॉम - अर्थशास्त्रबीएस्सी - केमेस्ट्रीबीएस्सी – फिजीक्सबी.ई. – यांत्रिकीबी.ई. – स्थापत्यबी.ई. – विद्युतबारावी सायन्स अथवा बारावी कॉमर्स, बारावी व्होकेशनल वगैरे. अशा वेळी आपणाकडे उद्योजकाने मागितलेली पदवी बीकॉम आहे मात्र उद्योजकाने विहित केलेला विशिष्ट विषय आपण पदवी अभ्यासक्रमात घेतलेला असल्यास व त्याची नोंद एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये असल्यास तुमच्या नावाची शिफारस होऊ शकेल. |
| गुणांची टक्केवारी | काही वेळेस उद्योजक गुणांच्या टक्केवारीनुसार उदा. पदवी परिक्षा टक्के अथवा जास्त गुणांनी उत्तीर्ण अशा उमेदवारांची मागणी करतात अशावेळी इतर नोंदणी तपशिल, जसे – पदवी, अनुभव, व्यवसायिक कौशल्य, नोंदणी दिनांक यानुसार जरी आपण पात्र होत असाल व तुमच्याकडे आवश्यक ती गुणांची टक्केवारी असल्यास तुमच्या नावाची शिफारस होऊ शकेल. |
| वास्तव्याचे ठिकाण | काहीवेळा खाजगी उद्योजक त्यांची आस्थापना, कारखाना ज्या परिसरात आहे, त्या परिसरांतच वास्तव्यास असलेले उमेदवार मागवितात व अशावेळी आपण सिनिऑरिटी ठरविण्याच्या इतर सर्व निकषात बसत असलात तरी उद्योजकाने कळविलेल्या परिसरांत आपण वास्तव्यास नसल्याने आपणास कॉल येत नाही. |