मुखपृष्ट मोठ्या भरतीची कार्यपद्धती शनिवार 20-03-2010, 11:59 am खाली
शिक्षण सेवक (प्राथमिक / माध्यमिक) पदभरती
       महाराष्ट्रामधील लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण सेवक आवश्यकता आहे. दरवर्षी लोकसंख्या वाढ त्याचबरोबर सेवेत असलेल्या शिक्षण सेवकांचे प्रमाण निवृत्तीने कमी होते. त्याकरिता दरवर्षी शिक्षण सेवक भरती आवश्यकता व नियमानुसार केली जाते. काय म्हणता राव ! आपल्यामध्ये उत्साह, उमेद, आहे. आपणांस शिक्षण सेवक म्हणून स्वतःचे उज्वल करिअर बनवायचे आहे का ?
       त्याकरिता शिक्षण सेवक कसे होता येईल ? त्याकरिता कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ? त्याकरिता कोणती शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे ? शिक्षण सेवक पदी नियुक्ती होण्यापर्यंतची प्रकिया निवड पद्घती काय आहे ?
       ती कोठे, कशी, कधी होते ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येउन जातात. तर चला त्याची उत्तरे खालील मुद्दयांवर क्लिक करुन मिळवा.
शैक्षणिक अर्हता
नियुक्तीचा कालावधी
वयोमर्यादा
शिक्षण अर्हतेतून सूट
मानधन
आरक्षण
अर्जाचा नमुना
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे
निवडीची कार्यपध्दती
शासन निर्णय
शैक्षणिक अर्हता
एस.एस.सी. / एच.एस.सी., अध्यापन शास्त्र पदविका (डी.एड.)
                 किंवा
शासनाने समकक्षता दिलेली व सध्या वैध असलेली अध्यापन शास्त्र पदविका अशी आहे.
महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्ह्याचा उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकेल.
नियुक्तीचा कालावधी
कायम व निर्विध पदावरील शिक्षण सेवकांच्या नियुक्तीचा कालावधी दोन वर्ष इतका राहील.
तसेच शिक्षण सेवकांना दीर्घ सुट्टीसह पूर्ण शैक्षणिक वर्षातील १२ महिन्याचे मानधन अनुज्ञेय राहील.
वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा १८ वर्ष व कमाल मर्यादा ३३ वर्षे अशी राहील.
तसेच मागास वर्गीयांसाठी ती ५ वर्षे शिथीलक्षम राहील.
शासन वेळोवेळी शासन निर्णयाव्दारे विहीत करील अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना आपोआप लागू होईल.
शिक्षण अर्हतेतून सूट
       शिक्षण सेवक या पदावर नियुक्ती करावयाच्या पदाच्या विहीत आरक्षणानुसार अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / विमुक्त जाती / भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग / इतर मागास प्रवर्ग या संवर्गातील प्रशिक्षीत उमेदवार (डी.एड. पदविका धारक किंवा समकक्ष) उपलब्ध झाले नाही, तर त्या संबंधित मागासवर्गीय प्रवर्गातील बी.ए. / एम.ए. / बी.एस्सी. / एम.एस्सी. / बी.एड. किंवा कला शास्त्र शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा कला शास्त्र शाखेतील पदवी किंवा एच.एस.सी. (बारावी) उतीर्ण या मधील गुणानुसार अप्रशिक्षीत उमेदवारांना खालील अटी व शर्तींवर नियुक्त्या देण्यांत येतील.
अ)वरील अर्हता धारण करणारे जरी पदवीधर असले तरी त्यांना डी.एड. अर्हता प्राप्त करेपर्यंत अप्रशिक्षीत उमेदवार म्हणून समजण्यात येईल.
ब)अप्रशिक्षीत उमेदवारांना नियुक्ती दिल्यानंतर त्यांनी तीन वर्षांच्या कालावधीत स्वखर्चाने पत्रव्दारा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विहीत अर्हता (डी.एड.) प्राप्त करून घ्यावी लागेल.
क)पत्रव्दारा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शासन वेळोवेळी विहीत करील असे शुल्क संबंधित अप्रशिक्षीत शिक्षकांनी भरणे बंधनकारक राहील.
ड)जे शिक्षण सेवक विहीत मुदतीत पत्रव्दारा डी.एड. अभ्यासक्रम उत्तीर्ण होणार नाहीत अशा अप्रशिक्षीत शिक्षण सेवकांना जास्तीत जास्त एक वर्षाची शिक्षण सेवक म्हणून मुदतवाढ दिली जाईल. या वाढीव मुदतीतही जे शिक्षण सेवक उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत, अशांच्या सेवा समाप्त करण्यांत येतील.
ई)ज्या शिक्षण सेवकांची निवड पत्रव्दारा डी.एड. साठी होऊन देखील काही अपरिहार्य कारणामुळे ते पहिल्या संधीचा लाभ घेऊ शकले नसल्यास त्यांना फक्त एक वर्षाची शिक्षण सेवक म्हणून मुदतवाढ दिली जाईल.
मानधन
शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती दिलेल्या उमेदवारांना दरमहा रूपये ३,०००/- मानधन दिले जाईल.
अ.क्र. (४) मधील अप्रशिक्षीत मागासवर्गीयातील बी.ए. / एम.ए. / बी.एस्सी. / एम.एस्सी. / बी.एड. किंवा एम.ए. / एम.एस्सी. किंवा बी.ए. / बी.एस्सी. किंवा एच.एस.सी. (बारावी) उत्तीर्ण उमेदवाराची निवड झाल्यास त्यांना रूपये १,५००/- मानधन दिले जाईल.
आरक्षण
शासकीय व निमशासकीय कर्मचारी भरतीसाठी विविध मागासवर्गीय संवर्गासाठी जे आरक्षण निश्चित केले आहे तेच आरक्षण शासन नियमानुसार शिक्षण सेवक म्हणून नियुक्तीसाठी लागू राहील.
आरक्षण निश्चित करतांना महिला / प्रकल्पग्रस्त / माजी सैनिक / अपंग इ. घटकासाठी लागू असलेले समांतर आरक्षणसुध्दा शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे विचारात घेण्यांत येईल.
अर्जाचा नमुना
शिक्षण सेवक पदासाठी वर्तमान पत्रात जाहित प्रसिध्द केली जाते.
तुम्ही वर्तमान पत्रामध्ये जाहिरातीचा जो नमुना दिलेला आहे त्या नमुन्यामध्ये व दिलेल्या विहित वेळेत नियुक्ती अधिका-यांकडे अर्ज सादर करावा.
अर्जासोबत काही कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल तर ती कागदपत्रे तुम्ही अर्जास जोडावीत.
अर्जातील प्रत्येक रकान्यातील माहिती काळजीपूर्वक भरून अर्ज सादर करावा.
सोबत तुमच्या माहितीसाठी अर्जाचा नमुना दिलेला आहे. तो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे
       अर्जदाराने अर्जासोबत खालील प्रमाणपत्रांच्या सुस्पष्ट दिसतील अशा राजपत्रित अधिका-यांनी प्रमाणित केलेल्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक राहील.
एस.एस.सी. गुणपत्रक व सनद
एच.एस.सी. (बारावी) गुणपत्रक व सनद
डी.एड. गुणपत्रक व सनद
बी.ए. / एम.ए. / बी.एस्सी. / एम.एस्सी. गुणपत्रक (अप्रशिक्षीत उमेदवारांसाठी)
बी.एड. गुणपत्रक व प्रमाणपत्र (अप्रशिक्षीत उमेदवारांसाठी)
जातीचे प्रमाणपत्र / क्रीमिलेयर प्रमाणपत्र सक्षम अधिका-याचे ग्राह्य धरण्यांत येईल.
रहिवासी प्रमाणपत्र
जात पडताळणी प्रमाणपत्र
माजी सैनिक / अपंग / प्रकल्पग्रस्त / महिला आरक्षण यांच्या वरील सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र ग्राह्य राहील.
निवडीची कार्यपध्दती
संदर्भिय शासन निर्णयात प्राधिकृत केलेल्या कार्यालयाकडून मागविण्यात आलेल्या प्रवर्गनिहाय व माध्यमनिहाय प्राप्त झालेल्या अर्जानुसार तयार केलेल्या उमेदवारांच्या याद्या एकत्र करून अध्यापन पदविकेच्या (डी.एड.) लेखी परिक्षेत गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यांत येते.
सदरील गुणवत्ता यादी अवलोकनासाठी, तपासणीसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यांत येते.
उमेदवारांनी गुणवत्ता यादीतील घेतलेल्या हरकती विचारात घेऊन अंतीम गुणवत्ता यादी तयार करण्यांत येते.
आदिवासी क्षेत्रात त्या त्या बोलीभाषेचे ज्ञान अवगत असणे आवश्यक असते.
मुलाखतीचे वेळी उमेदवाराची मुळ गुणपत्रिका व मुळ प्रमाणपत्रे तपासण्यांत येतात.
मुलाखतीचे वेळी उमेदवार शिक्षण सेवक या पदाची कर्तव्ये पूर्ण करू शकेल या दृष्टीने त्याचे व्यक्तिमत्व व शारिरीकदृष्टया सक्षमता पाहिली जाते.
मुलाखतीस कोणतेही गुण दिले जाणार नाहीत.
मुलाखतीस उमेदवारास स्वखर्चाने उपस्थित रहावे लागते.
उमेदवारांची अंतिम निवड ही गुणवत्ता यादीनुसारच केली जाते.
मुखपृष्ट | झटपट नोकरी | प्रश्नावली | चालु घडामोडी | उपयुक्त वेबसाईटस् | जाहिराती | मागे | वरती
Disclaimer | Acknowledgement | Designed & Developed By
All rights reserved with Directorate of Employment & Self-Employment , Government of Maharashtra
Site optimized for 1024 X 768 monitor resolution, Best viewed in IE / Opera.