|
आजच्या संगणकीकरणाच्या युगामध्ये माहितीचा जलद गतीने प्रसार होण्याकरिता माहिती संग्रहित करून ठेवणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सदरहू माहितीचा प्रसार सातत्याने होत राहण्याकरिता वेबसाईटस महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. अद्ययावत माहिती सामान्य जनांसमोर सादर करणे हे चांगल्या शासकीय यंत्रणेचे प्रमुख 'लक्षण' आहे.
रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, महाराष्ट्र राज्य हे राष्ट्रीय विज्ञान सूचना केंद्र, गणेशखिंड रोड, पुणे -411 007 यांची अत्यंत ऋणी आहे. त्यांनी वेबसाईट तयार करण्याच्या कामामध्ये फारच लवचिकता दाखविली. वेबसाईट तयार करतेवेळी त्यानी खूपच चांगल्या रितीने सहकार्य केले.
रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय श्रीमती. पूनम गुप्ता , तांत्रिक संचालिका,
राष्ट्रीय विज्ञान सूचना केंद्र, पुणे यांचे आभारी आहे. तसेच त्यांच्या सहकारी श्रीमती. सपना कपूर, श्रीमती. अर्चना निसळ, श्री. निमिष बंधू माजि यांनी आमच्या मनामधील स्वयंरोजगाराबाबतच्या कल्पनांना अतिशय चांगल्यारितीने वास्तव मूर्तरुप देऊन वेबसाईट अतिशय चांगल्या रितीने विकसित केलेली आहे. त्याबाबत आमचा विभाग त्यांचे अत्यंत आभारी आहे.
आयुक्त श्रीमती जयश्री मुखर्जी, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, नवी मुंबई यांनी कुठल्याही अटी व शर्तींशिवाय वेबसाईट तयार करण्याकरिता आम्हाला वेळोवेळी अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले व खूप मानसिक आधार दिला. याबद्दल त्यांचे आभारी आहोत.
वेबसाईट सारखे अतिशय चांगले काम पूर्ण करण्याकरिता ब-याच व्यक्तींचा सक्रीय सहभाग लाभलेला आहे. यामध्ये श्री संजय कापडणीस व्यवस्थापकीय संचालक अ. पा. अ. वि. महामंडळ, श्री पाटीलसाहेब व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र पुणे, श्री लोंढेसाहेब जिल्हा उद्योग केंद्र पुणे, श्री सुरेश वावरे मिटकॉन, श्री गावडे मॅनेंजर जिल्हा अग्रणी बँक पुणे, यांच्या अनुभवाचा व मौलिक मार्गदर्शनाचा उपयोग झाला. त्याबद्दल त्यांचेही खूप आभारी आहोत.
वेबसाईट तयार करण्याकरिता कोअर ग्रुपमधील सर्व सदस्यांनीही उत्स्फूर्त सहभागाशिवाय काम पूर्ण करणे शक्यच झाले नसते त्यामुळे त्यांचेही आभारी आहोत.
सर्व व्यक्तींची नांवे घेणे शक्य नाही तरी त्यांचे मिळालेल्या सहकार्याबाबत आभारी आहोत.
|