http://ese.mah.nic.in ही वेबसाईट रोजगार व स्वयंरोजगार, महाराष्ट्र राज्य या विभागाची अधिकृत वेबसाईट आहे. सुशिक्षित बेरोजगार व उद्योजक यांना मदत करण्याच्या हेतूने या विभागाने टाकलेले हे नवे पाऊल आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे काम, सुलभ व अतिशय सोप्या पध्दतीने, सहज समजेल अशा भाषेमध्ये सामान्य जनतेसाठी आम्ही अतिशय पारदर्शीपणे, की जेणेकरून प्रत्यक्ष आमच्या कार्यालयांना भेट न देता ही माहिती आपणास वेबसाईटद्वारे मिळू शकेल असा प्रयत्न केलेला आहे.
कायदेशीर कार्यवाही
सदरहू वेबसाईटचा उपयोग सामान्य जनतेला "माहितीकरिता" होऊ शकेल. या कामाकरिता हा विभाग कायदेशीरदृष्ट्या बांधील राहणार नाही. या विभागाने माहिती खूप काळजीपूर्वकरित्या एकत्रित केलेली आहे. यामधील टंकलेखनातील चुकांच्या दुरूस्तीकरिता रोजगार व स्वयंरोजगार विभाग व एन. आय. सी. जबाबदार राहणार नाहीत. परंतू जेव्हा आपणास माहितीमध्ये अपुरेपणा जाणवेल किंवा माहिती अद्ययावत करावयाची गरज आहे असे वाटेल तेव्हा आपण आमच्या वेबमास्टरला लिहू शकता, सूचना देऊ शकता. वेबमास्टर आपले म्हणणे संबंधित अधिका-यांपर्यंत पोहोचवतील आणि ते अधिकारी त्यावर योग्य ती कार्यवाही करतील.
महामंडळे/शासकीय यंत्रणा
या वेबसाईटव्दारे दुस-या विभागांच्या / मंडळांच्या / बोर्डाच्या / महामंडळांच्या / विद्यापीठांच्या इतर वेबसाईट जोडण्यांत आलेल्या आहेत. त्या वेबसाईटवरील अधिकृत माहितीबाबत संबंधित विभाग त्यास जबाबदार राहतील. सदरहू माहिती ही सामान्य जनतेला लाभ होण्याच्या दृष्टीने माहितीच्या स्वरूपामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याकरिता संबंधित / संघटना अथवा एन. आय. सी. कोणत्याही प्रकारच्या त्रुटीस जबाबदार राहणार नाहीत. याकरिता आपण वेबमास्टरला लिहावे अथवा ई-मेल करून दुरूस्ती / माहिती / अद्ययावत माहितीबाबत / अथवा सूचना असल्यास त्याप्रमाणे कळवावे.
सदरहू वेबसाईटवरील माहिती आवश्यकता भासेल त्याप्रमाणे अद्ययावत करण्यात येईल. संबंधित विभागांकडून प्राप्त झालेली अधिकृत माहिती ही अंतिमतः अधिकृत व अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
रोजगार व स्वयंरोजगार विभाग व एन. आय. सी. ही दोन्हीही कार्यालये एखाद्या तक्रारीच्या विलंबास, प्रतिक्रिया देण्यास जबाबदार राहणार नाही. विविध विभाग / कार्यालयांच्या कर्जाच्या कार्यवाहीच्या प्रक्रियेची माहिती होण्याकरिता त्या विभागांच्या विहीत नमुन्यातील अर्जाचे डाऊनलोड सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या विभागाचे अर्जाचे नमुने हे फक्त माहिती करिता दिलेले आहेत. कदाचित संबंधित विभागांच्या अर्जामध्ये तसेच अर्ज शुल्कामध्ये बदल होऊ शकतो. सदरहू माहिती कर्ज अर्जाच्या, प्रक्रियेविषयीची माहिती होण्याकरिता देण्यात आलेली आहे.
सूचना
वेबसाईटमधील माहिती अद्ययावत करण्याच्या दृष्टीने एखाद्या विषयामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने किंवा एखादी नविन सेवेबाबतची नविन माहिती देण्याकरिता आपण आपल्या सूचना वेबमास्टर किंवा सरळ आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, महाराष्ट्र राज्य, कोकण भवन, विस्तारित, ३ रा मजला, नवी मुंबई-४०० ६१४, फॅक्स- ०२२-२७५७३०१६ वर पाठवू शकता किंवा ई-मेल करू शकता.
सदरहू साईट ही एन. आय. सी., पुणे या संस्थेने विकसित केलेली आहे. त्याचबरोबर एन. आय. सी. चे महाराष्ट्रातील इतरही विभाग, विभागातील अधिकारी, केंद्रे यांनीही त्यामध्ये सक्रीय सहभाग दिला आहे. तांत्रिक सुधारणांमध्ये जर आपल्या काही सूचना असतील तर आपण आपल्या सूचना trng@mah.nic.in द्वारे पाठवू शकता
उद्योजक
उमेदवारांच्या माहितीबाबत रोजगार व स्वयंरोजगार विभाग कुठल्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. उद्योजकांनी उमेदवारांची माहिती वेबसाईटद्वारे घेतल्यानंतर, त्याच्या मूळ प्रमाणपत्रांची तपासणी करून खात्री करावी
उमेदवार
रोजगार व स्वयंरोजगार विभाग हा कुठल्याही उमेदवाराच्या नोकरीच्या निवडीसंबंधी / नाकारल्यासंबंधी किंवा त्या व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीस जबाबदार राहणार नाही. आपणास याबाबत काही तक्रारी असल्यास आपण संबंधित उद्योजकांशी संपर्क साधावा.